औरंगाबाद जवळील काही झणझणीत मटण आणि चिकनसाठी ठिकाणे -1
अस्सल मराठवाडी, तिखट नॉनव्हेज खाण्याची औरंगाबाद व औरंगाबाद जवळील ठिकाणे शेअर करीत आहे. आवडल्यास नक्की भेट द्या.१)पाल फाटा :
मटण/चिकन खाणाऱ्या औरंगाबादकराला हे ठिकाण माहित नाही असे होऊच शकत नाही.अस्सल पाटा, वरवंटा वापरुन मसाले बनवणारी आजीबाई.ह्या ठिकाणची चव चाखलीच पाहिजे.
कसे जाल:-औरंगाबाद पासून 30 किमी अजिंठा रोडवर पाल गावाचा फाटा आहे. सोनिया हॉटेल च्या समोरच आजीबाई ची झोपडी आहे.
मटण किंवा चिकन हे तुम्हाला स्वतः खरेदी करून आजीला द्यावे लागते..(दुकाने समोरच आहेत).
आजीच्या झोपडीच्या बाजुला ऐसपैस " बसण्याची" जागा आहे.
खासियत: मटण/चिकन उक्कड , सुक्के मटण/ चिकन, तर्रीदार काळ्या मसाल्यातील मटण/ चिकन आणी बाजरीची भाकर ( चपाती आणि भात सुद्धा मिळतो)
पाल फाट्यावरील मटण
२) बापूज ढाबा औट्राम घाट, कन्नड
|
निसर्गाच्या सान्निध्यात गावरान कोंबडी खायची असल्यास ह्या जागेला जरुर भेट द्या... अतिशय सुंदर जागा ..
कसे जाल:
औरंगाबाद-चाळीसगाव रस्त्यावर ..कालीमठ फाट्या नंतर डावीकडे बापूज ढाबा आहे...
खासियत: गावरान चिकन/ कडकनाथ चिकन/ साजुक तुपातला शिरा/ गावरान चण्याची भाजी
३)गुलाम हॉटेल-सावंगी फाटा
काळ्या मसाल्याच्या भाज्या खाऊन कंटाळलेल्या लोन्कासाठी....कमी मसाला वापरुन रुचकर मटण/ चिकन साठी आणि हिरव्या मसालात बनवलेली बोटी/ वझाडी .
कसे जाल:
औरंगाबाद पासन ३ किमी अजिंठा रोड वर सावंगी बायपास आहे...हॉटेल बायपास कोर्नेर वर आहे.
मटण/चिकन स्वतः आणून द्यावे.
खासियत: मुस्लीम पध्दतीचे मटण/चिकन... हिरव्या मासाल्यातली बोटी/ वझाडी fry
ह्यानंतर खाली सांगितलेल्या जागा सुद्धा बेस्ट आहेत.... त्यांची नावे आणी पत्ता फक्त तुमच्यासाठी..
१) साई ढाबा- केमब्रिज स्कुल नंतर डावीकडे
२) मोनिका - शेंद्रा टोल नाक्याच्या उजवीकडे....मस्त रोस्ट चिकन/ मटण ...
३)काळे बंधु- चिकलठाणा... हिरव मटण
४)शेळके बंधु- वेरुळ (एलोरा) चौफुली
अजुन भरपुर जागा आहेत...... पण आज एवढच....

0 comments:
Post a Comment