AURANGABAD FOODIE

बांगड्याचे फिश कटलेट्स

3

फिश किंवा माश्याचे कटलेट हे चवीला खूप टेस्टी लागतात. अश्या प्रकारचे कटलेट आपण जेवणात साईड डीश म्हणून बनवू शकतो. हे कटलेट बनवतांना मी बांगडा हा ताजा फिश वापरला आहे. प्रथम फिश साफ करून त्याचे पोट साफ करून घेवून त्याला थोडे मीठ व हळद लावून घेतली. मग तव्यावर १/२ टी स्पून तेल घालून मासे भाजून घेवून त्याचे बारीक बारीक काटे काढले व मग त्याचे कटलेट बनवले आहेत. ज्यांना मासे आवडतात त्यांना अश्या प्रकारचे कटलेट नक्की आवडतील. बांगडा ह्या माश्याचे कटलेट बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडतील.


साहित्य:
२ बांगडा मासे
१/४ टी स्पून हळद
४ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून)
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
१५-२० लसूण पाकळ्या
१” आले (तुकडा)
२-३ हिरव्या मिरच्या
१/२ कप पुदिना पाने (चिरून)
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१ टी स्पून दालचीनी पावडर
१ टी स्पून लिंबूरस
मीठ चवीने
१ अंडे (फेटून)
३ टोस्ट (पावडर)
तेल कटलेट शालो फ्राय करण्यासाठी

कृती:

प्रथम मासे साफ करून त्याचे पोट साफ करून धुवून घ्या. मग त्याला थोडे मीठ व हळद लावून घ्या. कांदा, आले-लसूण-हिरवी मिरची, कोथंबीर, पुदिना चिरून घ्या, बटाटे उकडून सोलून किसून घ्या. अंडे फेटून घ्या.
तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल घालून हळद-मीठ लावलेले फिश तव्यावर ठेवून ८-१० मिनिट मंद विस्तवावर दोनी बाजूनी भाजून मग विस्तव बंद करून मासे थंड करायला बाजूला ठेवा. मासे थंड झाल्यावर त्यातील बारीक बारीक काटे सुद्धा काढा.
कढईमध्ये १ टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आले-लसूण-हिरवी मिरची २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून मग त्यामध्ये सोलेलेल मासे, उकडलेले बटाटे, मीठ, लिंबूरस, चिरलेली कोथंबीर, पुदिना घालून एक सारखे मिक्स करा.
मग त्यामध्ये फेटलेले अंडे, दालचीनी पावडर घालून चांगले मिक्स करा. टोस्ट बारीक करून एका बाउल मध्ये ठेवा. तयार केलेल्या मिश्रणाचे एक सारखे गोळे बनवून बनवलेल्या टोस्ट पावडर मध्ये घोळून बाजूला ठेवा. अश्या प्रकारे सर्व गोळे ह्या पद्धतीने बनवून बाजूला ठेवा.
नॉन स्टिक पॅन गरम करून त्यामध्ये बनवलेले कटलेट मांडून ठेवा. मग बाजूनी थोडे थोडे तेल सोडून दोनी बाजूनी शालो फ्राय करून मंद विस्तवावर छान खरपूस भाजून घ्या.
गरम गरम फिश कटलेट टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

3 comments: Leave Your Comments

  1. Waah he nakkich kahitari navin ahe :) just too curious about the dalchini part. if we skip it will it taste good?
    http://vrag.in

    ReplyDelete
    Replies
    1. Aurangabad foodie26 July 2018 at 08:44

      हो दालचिनी नसेल आवडत तर तुम्ही स्किप करु शकता... माशाला स्वतःचा असा नैसर्गिक स्वाद असतो

      Delete
    2. went thru your blog.....awesome read... do check my other food travel blog https://foodieonroad.blogspot.in
      also check out my youtube channel
      https://youtube.com/prakashtakate

      thanks

      Delete

/>