AURANGABAD FOODIE

चिकन दालचा

0

साहित्य..

चिकन 250 ग्राम, चणा डाळ 1/2 कप,

मसूर डाळ 1/2 कप, 1 मोठा कांदा,

1 टोमॅटो, ओली मिरची 2 ते 3,

सुखी लाल मिरच्या 3,

लसुण 10 ते 12 पाकळया,

आल छोटा तुकडा,

मोहरी, जीर 1 चमचा,मेथी 1/4 चमचा,

1 चमचा तुप, 2 चमचे तेल कोथिंबीर,

पुदीना , मीठ, मिरची पावडर 1 चमचा,
धने पावडर 1/2 चमचा, लिम्बु,

हळदी पावडर, दालचीन,

लवंग 6,वेलदोड़े 4..

कृति..

1)) प्रथम दोन्ही डाळी कुकर मधे शिजवून घ्या चिकन चे तुकड़े धुवून मीठ ,हळदी पावडर व लिम्बु रस लावून ठेवा 2)) कांदा, टोमॅटो, आल ,लसुन, ओली मिरची बारीक़ चिरून घ्या सुखी मीरच्या चे तुकडे करा 3)) एक कड़ई मधे तूप व तेल घालून गॅस वर ठेवा . तेल तापल की त्या मधे मोहरी ,जीर ,टाका मोहरी तड़तड़ली की मेथी , करीपत्ता, लाल मिरची, अख्खे मसाले टाका जरा परतुन त्या मधे कांदा, ओली मिरची, लसुन टाकून परता कांदा मऊसर झाला की टोमॅटो, आल घाला व छान परता , मिरची पावडर धने पावडर टाका मिश्रण एक्जीव झाल की त्या मधे चिकन घालून अर्ध शिजवून घ्या 4)) चिकन अर्ध शिजल की लगेच शिजलेली डाळ, व् पाणी घालून चिकन मंद आचेवर पूर्ण शीजु दया.. 5)) शेवटी कोथिंबीर पुदीना व चविनुसार मीठ, लिम्बु रस घालून परत 2 मिनिट उकळा 5)) तेल तापवून करीपत्ता घालून फ़ोडनी तयार करा व् तयार दालच्या मधे मिक्स करा दालच्या प्लेनभात, जीराराइस किंवा पुलाव सोबत वाढा

0 comments:

Post a Comment

/>