साहित्य
4 गाजर साली काढून घ्याव्यात
1/4 कप पाणी
1 केळी थंड केलेली
1 मोठा आंबा तुकडे करुन किंवा आंबा नसल्यास मॅंगो पल्प चालेल
1 चमचा अद्रक बारीक केलेली
1 चमचा शुद्ध मध
1 चमचा हळद
1 चमचा लिंबाचा रस
1/2 कप बदाम दूध
कृती
एका मिक्सर मध्ये गाजर आणी पाणी टाकून हाय स्पीड वर त्यांचा स्मूथ जुस बनवून घ्या.
चाळणी किंवा चांगल्या कपड्यातून जुस गाळून घ्या.
मग ब्लेंडर मधे 1/2 कप जुस आणी वरती सांगितलेले साहित्य मिक्स करा....
मिक्सर हाय स्पीड वर करा जोपर्यंत सगळे मिक्स एकदम स्मूथ आणी क्रिमी होई पर्यन्त.
झाला तुमचा हेल्दि शेक तयार
रेसिपी चांगली वाटल्यास तुमच्या प्रतिक्रिया जरुर द्या
0 comments:
Post a Comment