लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
थाय फ्लॅट राइस नूडल्स
डार्क सॉय सॉस (किंवा नेहमीचा सॉय सॉस +मध) - २-३ चमचे
ऑय्स्टर सॉस किंवा फिश सॉस - १ चमचा
श्रिराचा सॉस २ चमचे किंवा आवडीनुसार
व्हाइट व्हिनिगर २-३ चमचे
चिकन ब्रेस्ट पीसेस लहान तुकडे करून - साधारण एक बोल भरुन
२ अंडी
भाज्या- तुमच्या आवडीच्या - चायनीज ब्रोकोली, बॉकचॉय, बीन स्प्राउट्स,कोबी, गाजर, मश्रूम, इ.
एक मध्यम कांदा
लसूण बारीक तुकडे करून - ३-४ पाकळ्या
कांद्याची पात - वरून घालायला
क्रश्ड शेंगदाणे - हे पण वरून घालायला, ऐच्छिक
लिंबू - ऐच्छिक
क्रश्ड चिली फ्लेक्स - ऐच्छिक
क्रमवार पाककृती:
आमच्या इथे एका थाय रेस्टॉरन्ट मध्ये ही एक वन डिश मील पाड सी यु ( नक्की कसा उच्चार आहे कोण जाणे) या नावाने मिळते. घरात सगळ्यांना आवडल्याने अनेकदा खाऊन, थोडा अंदाज मारून आणि थोड्या इन्टरनेट वरच्या रेसिपीज सर्च करून केलेले हे कोंबिनेशन आहे. ऑथेन्टिक वगैरे असेल असा दावा अजिबात नाही पण हे फायनल प्रॉडक्ट त्या चवीच्या बर्याच जवळ वाटले म्हणून आता हीच माझी रेसिपी
चिकन चे तुकडे सोय सॉस आणि थोडा श्रीराचा सॉस लावून मॅरिनेट करायला ठेवावे.
एकीकडे पाणी उकळायला ठेवून भाज्या कापून घ्याव्यात. यावेळी कांदा, रंगीत स्वीट पेपर्स, मश्रूम स्लाइसेस् असे घेतले.
भाज्या कापून होईपर्यन्त पाणी उकळेल. पण त्यांचा आणि त्या उकळलेल्या पाण्याचा काही संबंध नाही, ते आपले वेळ कसा वाचवावा हे सांगण्यासााठी लिहलेय Happy तर त्या पाण्यात राइस नूडल्स टाका. (कुठल्याही एशियन ग्रोसरी मिळणार्या दुकानात मिळतात)
पॅकेट वर लिहिल्याप्रमाणे शिजवा. हे नूडल्स बहुतेक वेळा फार चटकन, अगदी १ मिनिटात शिजतात. जास्त शिजवायचे नाही आहेत त्यामुळे लक्ष द्यावे आणि जेमतेम मऊ झाले की लगेच गॅस बंद करून पाणी काढून टाकावे आणि नूडल्स ना थोडे तेल लावून बाजूला ठेवावे.
कढईत थोडे तेल गरम करून त्यात चिकन परतून घ्यावे, लहान तुकडे असल्यामुळे चटकन शिजते. तेही बाजूला काढून घ्या.
तेलात लसूण थोडा परतून लगेच कांदा घालावा, जरा परतून झाल्यावर इतर भाज्या घालून थोडे झटपट परतावे. फार शिजवू नये.
कढईतच हे सर्व जरा बाजूला सरकवून २ अंडी फोडून कढईत टाकावी आणि स्कँबल करून घ्यावी. हा मह्त्त्वाचा घटक आहे. स्क्रँबल्ड एग्ज चे मिश्रण नूडल्स ना आणि भाज्यांना माखल्यामुळे या पदार्थाला ला एक मस्त टेक्स्चर येते.
गॅस ची आच जरा कमी करून सर्व सॉस आणि व्हिनेगर घालावे. डार्क सोय सॉस ची चव नेहमीच्या सोय सॉस पेक्षा वेगळी , गोडसर असते. त्यामुळे तो नसेल तर २ चमचे साधा सोय सॉस आणि त्यात २ चमचे मध असे मिश्रण मी वापरते जे पर्फेक्ट वर्क होते. फिश सॉस ची चव आणि वास सगऴ्यांना आवडेल असे नाही. नसेल आवडत तर वगळला तरी चालेल. तसेच सोय सॉस आणि व्हेनेगर च्या व्यतिरिक्त कधी असलाच तर एशियन स्टोर मधला पीनट सॉस ( किंवा स्वतः केलेला) तोही घातला तर झाले माझे पाड थाय
शिजलेले नूडल्स , चिकन घालून खाली वर करून सर्व सॉस त्याला नीट लागेल असे पाहून हलवावे.
गॅस बंद करून वरून कांद्याची पात, क्रश केलेले शेंगदाणे, हवे तर क्रश्ड रेड पेपर घालून, लिंबू पिळुन खायला घ्यावे.
वाढणी/प्रमाण:
वरचे प्रमाण ४ लोकांना पुरावे.
अधिक टिपा:
नूडल्स फ्लॅटच घ्यावे.
पाकिटावरून चटकन किती पुरेल याचा अंदाज येणे अवघड होते. पाण्यात घालताना पुरेल की नाही वाटते आणि शिजल्यावर खूप जास्त झाले की काय असे होते. शिवाय भाज्या, चिकन हे असतेच. ते वरचे १ पाउंड चे पॅक मी आख्खे न घेता पाउण वापरले. तरी ४ लोकांना व्यवस्थित झाले.
चिकनच्या ऐवजी श्रिंप, टोफू हेही चालेल.
भाज्यांव्यतिरिक्त लहान लहान पायनॅपल चे तुकडे पण छान लागतात.
पात नसेल तर वरून पेरायला कोथिंबीर पण छान लागते. थोडक्यात काय तर हवे तितके व्हेरिएशन्स करू शकता!
हा पदार्थ त्यातल्या सॉस, व्हेनिगर आणि स्क्रॅम्बल्ड एग्ज् या काँबिनेशन्मुळे ओलसर असतो. चायनीज हक्का नूडल्स इतका कोरडा नसतो. चव आंबट गोड + तिखट अशी काहीशी सांगता येईल.
माहितीचा स्रोत:
माझे प्रयोग आणि नेट वरच्या रेसिपीज
0 comments:
Post a Comment