AURANGABAD FOODIE

चिकन तंगडी मसाला

0
साहित्य – 
दोन मध्यम चिकन तंगडी, बारीक चिरलेला कांदा, ओरिजनल काळा  मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, बारीक चिरलेले टोम्याटो, क्रश केलेले ( कुटलेले ) आलं आणि लसून, १ ते २ उभ्या चिरलेल्या मिरच्या, भाजलेल्या सुख्या खोबर्याची पेस्ट, चवी नुसार मीठ आणि तळण्याकरिता तेल.
कृती – 
सर्व प्रथम चिकन तंगडींना मॅरिनेशन करण्यासाठी चिमुटभर हळद आणि अर्धा चमचा मीठ लावावे. साधारण ३० मिनिटे आता ह्या तंगडींना मुरण्यासाठी ठेवावे. तंगडीं मुरत आहे तो पर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. एका कढईत ३ चमचे तेल टाकून चांगले तापवून घ्यावे. तेल बर्यापैकी तापल्यावर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा तेलात चांगला भाजून घ्यायचा. कांदा भाजल्यावर त्यात दीड चमचा क्रश केलेले आले लसुन टाकायचे आणि २ मिनिटे तेलात खरपूस भाजून घ्यायचे. आता अर्धा चमचा हळद टाकायची. ४ चमचे ओरिजनल काळा  मसाला टाकायचा. चिकन तंगडी आहे अर्थात आपल्याला एकदम झणझणीत बनवायची आहे. खाताना मस्त नाका डोळ्यातून पाणी आले पाहिजे. मसाला तेलात चांगला परतून घ्यावा. आता बारीक चिरलेली टोम्याटो टाकायची. साधारण एक वाटी. सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. नंतर यात उभ्या चिरलेल्या एक ते दोन मिरच्या टाकाव्यात. पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकत्रित पारून घ्यावे. आता या मिश्रणात चिकन तंगडी शिजण्यासाठी सोडाव्यात. आपण बनवलेला सर्व मसाला चिकन तंगडीला व्यवस्थित लावावा. आता १० मिनिटे एका बाजूने आणि १० मिनिटे दुसर्या बाजूने झाकण ठेवून चांगले शिजवून घ्यावे. शिजत असताना मध्ये मध्ये पडताळून पाहावे. मसाले एकत्रित ब्लेंड ( एकजीव ) होण्यासाठी फक्त थोड्याफार पाण्याचा वापर करायचा, जास्त पाणी वापरू नय. आता यात आपली भाजलेली सुख्या खोबर्याची पेस्ट असाधारण २ चमचे टाकायची आहे.नंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. सर्व मिश्रण आणि चिकन तंगडी व्यवस्थित परतून घ्यावी. सर्व मिश्रण १० मिनिटे मस्त शिजू द्यावे. आपल्या चवी नुसार यात मीठ टाकावे आणि ५ मिनिटे पुन्हा सर्व मसाले आणि चिकन तंगडी व्यस्थित परतून शिजून घ्यायची. आता आपली मस्त  मसाल्यात बनवलेली सर्रास झणझणीत चिकन तंगडी मसाला तयार आहे.

0 comments:

Post a Comment

/>