आज स्वतः घरी बनवलेत... ज्याला करंज्या बनवता येतात त्याला हि डिश जरूर जमेल ...रेसिपी शेअर करतोय नक्की बनवुन बघाच ..
१)कणकेचा गोळा बनवण्यासाठी एक मोठी वाटी मैदा, अर्धी वाटी मक्याचे पीठ, थोडेसे गावरान तूप आणि गरम पाणी
-एका बाउल मधे मैदा मक्याचे पीठ आणि तूप मिक्स करा , त्यात थोडे गरम पाणी घालून मस्त गोळा तयार करुन बाजूला ठेवा
फीलिंग्स बनवण्यासाठी साहित्य
१) मटण किँवा चिकन खिमा अर्धा किलो
२)लसणाच्या पाकळ्या
३)अद्रक एक इंच
४)दोन किंवा तीन कांद्याच्या पाती
५)१ गाजर
६)कोथिंबीर
७)तिळाचे तेल ३ ते ४ चमचे
८)१ चमचा मीठ
९)अर्धा चमचा साखर
१०)२ अंडे
११) चिरलेली पत्ता कोबी अर्धा वाटी (आवडत असल्यास प्रमाण वाढवु शकता )
१२)सोया सौस ४ ते ५ चमचे
१३) ऑईस्टर सौस (ऎच्छिक -- समुद्री स्वाद आवडत असल्यास ) डी मार्ट किंवा मोर मधे भेटेल किंवा ऑनलाईन मागवु शकता)
लसून ,गाजर ,अद्रक.कोथिंबीर , कांद्याची पात पत्ता गोबी ह्यांना चाकूने बारीक कापा (मिक्सर मधे नाही) ..
एका बाउल मधे मटण किँवा चिकन खिमा घ्यावा त्यात तिळाचे तेल घालावे . नंतर त्यात सोया सौस , ऑईस्टर सौस,अंडी फोडून व भाज्या घालून हाताने चांगले मिक्स करावे..मिश्रण तयार झाले कि अर्धा तासासाठी फ्रिज मध्ये ठेवावे ..
आधी तयार करून ठेवलेल्या कणकेच्या गोळ्याच्या मोठ्या करंज्या बनवण्यासाठी पुऱ्या बनवुन घ्याव्यात .. त्यात वरती बनवलेले मटण किंवा चिकन चे मिश्रण टाकावे व कारंजी सारखा आकार द्यावा (लक्षात ठेवा कारंजी सारखे मिश्रण पूर्ण भरायचे नाही सेंटर मधे भरायचे जेणेकरून तिचे दोनही टोके मोकळी राहतील )...करंजी बनवून झाली की तिची दोनही टोकी थोडे पाणी लावुन मागच्या बाजूला घेऊन एकमेकास चिटकावून थोडासा फुलासारखा आकार द्यावा ...
अशीच बाकीची वोन्टन बनवावीत ...एका कढईत तेल टाकून ह्यांना थोडंसं लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावे (हलकासा लालसर आणि क्रिमी रंग).....
झाले तुमचे वोनटॉन्स तयार ... ह्याला शेजवान किँवा गार्लिक सौस सोबत सर्व्ह करावे ...अतिशय अप्रतिम लागतात ..
0 comments:
Post a Comment