कोकणी पद्धतीचे हे पारंपारिक लोणचे आहे. हे लोणचे तयार झाल्यावर थंड करून फ्रीज मध्ये ठेवावे मग ते एक महिना चांगले रहाते. मटणाचे लोणचे हे कमी वेळात बनवता येते व कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर असे बनवलेले लोणचे झुणका-भाकरी बरोबर सर्व्ह करता येते.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १ किलो ग्राम बनते
वाढणी: १ किलो ग्राम बनते
साहित्य:
१ किलो ग्राम मटन
३ टी स्पून धने (थोडे घसटून)
३ टी स्पून जिरे (थोडे घसटून)
३ टी स्पून मोहरी
१ टी स्पून हळद
१ टे स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
२ टी स्पून साखर
३ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१ कप व्हेनीगर
१ कप तेल
१ किलो ग्राम मटन
३ टी स्पून धने (थोडे घसटून)
३ टी स्पून जिरे (थोडे घसटून)
३ टी स्पून मोहरी
१ टी स्पून हळद
१ टे स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
२ टी स्पून साखर
३ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१ कप व्हेनीगर
१ कप तेल
कृती:
प्रथम मटणाचे तुकडे चांगले धुवून घ्या. एका कढाईमध्ये तेल गरम करून आले-लसूण पेस्ट, धने, जिरे, मोहरी, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, साखर, व्हेनीगर, मटणाचे तुकडे मिक्स करून घेऊन मंद विस्तवावर कढई ठेवा. कढाईवर स्टीलची प्लेट ठेवून त्या प्लेट वरती पाणी घालून मंद विस्तवावर मटन ४०-४५ मिनिट शिजू द्या.
मटणाचे लोणचे थंड झाल्यावर बरणीमध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवा, लागेल तसे लोणचे काढून घ्या. मग चपाती बरोबर सर्व्ह करा.

0 comments:
Post a Comment