AURANGABAD FOODIE

हा ब्लॉग फक्त मांसाहार करणाऱ्यांसाठी आहे देशविदेशातल्या अप्रतिम मांसाहारी डिशेशच्या रेसिपीज मराठी आणि हिंदीत येथे उपलब्ध आहेत #

ही एक पर्शियन  डिश आहे हिला "पीलपील" हे सुद्धा नाव आहे ...आणि लागणारे सगळे साहित्य तुम्हाला घरात सापडेल...अतिशय चविष्ट लागते ..खाली रेसिपी दिलीय एकदा करुन बघाच.
साहित्य:-
1 कप काबुली चणे रात्रभर भिजवून ठेवा
1/2 कप ओव्याची पाने
1/4 बारीक कांदा
3 लवंग आणि लसून
4 चमचे तेल (2 भागात)
1 चमचा लिंबाचा रस
1 चमचा जिरे पावडर
1/2 चमचा मीठ
1/4 बेकिंग सोडा
1-3 चमचे पाणी (जरुरी असल्यास)

Buy me a coffeeBuy me a coffee
कृती:-
चण्यातले पाणी काढून त्याला मिक्सर मध्ये टाका .. मग त्यात ओव्याची पाने, कांदा,लसूण,लवंग,1 चमचा तेल, लिंबाचा रस, जिरा पावडर, मीठ आणि बेकिंग सोडा टाकून मिक्स करा...मग त्यात थोडे थोडे पाणी टाकून घट्ट पॅटीस चे मिश्रण बनवा (जास्त पाणी टाकू नये)

मिश्रण 3 चमचे एका पॅटीसच्या हिशोबने काढून त्याचे  गोल पॅटीस बनवा
नॉनस्टिक तव्यावर 2 चमचे तेल मेडियम/हाय आचेवर गरम करावे.. व नंतर गॅस मीडियम करावा.
मग त्यावर आपण बनवलेले पॅटीस 3 ते 5 मिनिट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळावेत...नंतर अजून थोडेसे  तेल टाकून दुसर्‍या बाजूनेही 3 ते 5 मिनिट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळावेत....
झाले तुमचे कुरकुरीत आणि स्वादिष्ट फलाफल तयार...हयाला टोमॅटो सॉस किंवा मेयोनीज अथवा कुठल्याही चायनीज सॉस सोबत गरम सर्व करावे...
रेसिपी आवडली तर खाली जरूर प्रतिक्रिया द्या



साहित्य
4 गाजर साली काढून घ्याव्यात

1/4 कप पाणी

1 केळी थंड केलेली

1 मोठा आंबा तुकडे करुन किंवा आंबा नसल्यास मॅंगो पल्प चालेल

1 चमचा अद्रक बारीक केलेली

1 चमचा शुद्ध मध

1 चमचा हळद

1 चमचा लिंबाचा रस


1/2 कप बदाम दूध

कृती

एका मिक्सर मध्ये गाजर आणी पाणी टाकून हाय स्पीड वर  त्यांचा स्मूथ जुस बनवून घ्या.
चाळणी किंवा चांगल्या कपड्यातून जुस गाळून घ्या.
मग ब्लेंडर मधे 1/2 कप जुस आणी वरती सांगितलेले साहित्य मिक्स करा....
मिक्सर हाय स्पीड वर करा जोपर्यंत सगळे मिक्स एकदम स्मूथ आणी क्रिमी होई पर्यन्त.
झाला तुमचा  हेल्दि शेक तयार

रेसिपी चांगली वाटल्यास तुमच्या प्रतिक्रिया जरुर द्या


साहित्य:-

2 सफरचंद (हिरवी किंवा लाल
लिंबु पाणी (सफरचंद तपकिरी न होण्यासाठी)
2 चमचे साखर
1/4 चमचा दालचीनी पावडर
1/4 कप (55 ग्रॅम) लोणी
2 चमचे ब्राऊन शुगर
1/2 चमचा मीठ
1 कप (240 मिली) पाणी
1 कप (125 ग्रॅम) मैदा
4 अंडे
तेल तळण्यासाठी

कोटींग साठी:

1/4 कप (50 ग्रॅम) बारीक साखर
1 चमचा दालचीनी पाउडर
Buy me a coffeeBuy me a coffee

साधन:

1 पाइपिंग बॅग किंवा आपला चकल्याचा झारा चालेल

कृती:

  1. सफरचंदाची साल पीलर ने काढून ती लिंबाच्या पाण्यात बुडवून ठेवा (तपकिरी होणार नाहीत)
  2. नंतर सफरचंद काढून किसनीने त्याचा कीस काढून घ्या
  3. एका भांड्यात किसलेले सफरचंद साखर आणि दालचीनी शिंपडून बाजुला ठेवा
  4. high गॅस वर सॉस पॅन घेवुन त्यात लोणी,ब्राऊन शुगर,मीठ आणि पाणी एकत्र मिक्स करुन एक उकळी येवू द्या

  5. गॅसला मंद आचेवर करुन त्यात मैदा टाका.... लाकडी चमचा वापरुन सारखे हलवत रहा , जोपर्यंत पिठाचा बॉल होत नाही तोपर्यंत (1 मिनिट पर्यंत)
  6. ह्या मिश्रणाला गॅस वरुण काढून 5 मिनिटं थंड होण्यासाठी बाजुला ठेवा ( पूर्ण थंड होऊ द्या कारण नंतर अंडी हयामधे टाकायचीत)
  7. एकावेळी एक अंडे ह्या मिश्रणात टाकावे व चांगले हलवून एकजीव केल्यानंतरच दुसरे अंडे टाकावे, हेच बाकी दोन अंड्यासाठी करावे.
  8. एका साफ कपड्यावर आधी बनवलेला सफरचंद कीस घेवुन तो पिळून काढावा..त्यातील पूर्ण पाणी काढावे
  9. मग हा कीस आपण नंतर बनवलेल्या कणीकच्या मिश्रणात टाकुन लाकडी चमचाने हलवून सगळे एकजीव करावे
  10. नंतर हे मिश्रण पाइपिंग बॅग मधे किंवा चकलीच्या झार्‍यात टाकावे
  11. एका कढईत तेल घेवुन ते 180 डिग्री सेल्सियस पर्यंत उकळवा
  12. मग त्यात मिश्रण पाइपिंग बॅग किंवा झर्‍याने 3 किंवा 4 इंचाच्या तुकड्यात टाकावे व सोनेरी कलर येईपर्यंत तळावे
  13. तळलेल्या नगेट्स ना नंतर बारीक साखर आणि दालचीनीच्या मिश्रणाने कोट करावे....
  14. झाले तुमचे स्वादिष्ट सफरचंद नगेट्स तयार.... रेसिपी  आवडली तर खाली जरुर प्रतिक्रिया द्या


साहित्य:-

सहा जणांसाठी
1/2 कप (70 ग्रॅम) तांदळाचे पीठ
1 चमचा लसूण पावडर
1/2 चमचा बारीक काळी मिरी
1/2 चमचा मीठ
900 ग्रॅम चिकन (ब्रेस्ट किंवा लेग पीस)
तेल (तळण्यासाठी)

हनी गार्लिक सॉस बनवण्यासाठी

1 चमचा बटर
1 चमचा लसूण पावडर
1 चमचा अद्रक
1/2 कप (120 मिलि) सोया सॉस
5 चमचे मध
1 चमचा ब्राऊन शुगर
1 चमचा तिळाचे दाणे
2 कांद्याची पात

Buy me a coffeeBuy me a coffee

कृती

एका भांड्यामधे तांदळाचे पीठ,लसूण पावडर, बारीक काळी मिरी आणि मीठ मिक्स करा
चिकनचे पीस वरील मिश्रणाने चांगले कोट करा
फ्राय पॅन मधे 1/4 किंवा 6 मिमी भरेल एवढे तेल ओता आणि मेडीयम गॅस वर तळण्यापुरते गरम करा
चिकनचे पिस छोट्या छोट्या भागात 4 मिनिटे प्रत्येक बाजूने (4 मिनिट एका बाजूने, 4 मिनिट दुसर्‍या बाजूने) तळून घ्या
नंतर सगळे पिस एका पेपर टॉवेल वर ठेवून द्या
मीडियम गॅसवर फ्राय पॅन मधे बटर वितळवून त्यात अद्रक आणि लसूण टाका
मग त्यात सोया सॉस, मध आणि ब्राऊन शुगर टाका आणि 5 ते 7 मिंनिटांपर्यंत सारखे हलवत मिश्रण थोडेसे घट्ट करा.
मग त्यात आधी तळलेले चिकनचे पिस टाका व त्यांना ह्या सॉस ने चांगले कव्हर करा...व शेवटी हलकेसे तिळाचे दाणे टाका....
झाले तुमचे चिकन हनी गार्लिक तयार...  वरून थोडी कांद्याची पात शिंपडून वाढा
ह्या रेसिपीबद्दल तुमच्या प्र्तिक्रिया खाली जरूर द्या


लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 
१ कोंबडी
१ मोठा चमचा आले - लसूण पेस्ट
अर्धा कप दही
१ वाटी ओले खोबरे
२ चमचे तीळ + १ मोठा चमचा खसखस (भाजून पूड करावी)
(२ कांदे,
५ - ६ मिरच्या,
Buy me a coffeeBuy me a coffee
१ इन्च आल्याचा तुकडा,
१० - १२ लसूण पाकळ्या,
१ जुडी कोथिंबीर) हे सर्व बारीक चिरून घ्यावे.
अर्धा कप काजूचे तुकडे
पाव कप बेदाणे,
२ मोठे चमचे तिखट
अर्धा चमचा हळद
१ चमचा गरम मसाला पावडर
अर्धा वाटी सुके खोबरे
१ कप तेल / तूप
२ लिंबांचा रस
मीठ.
क्रमवार पाककृती: 
कोंबडीची स्किन काढून कोंबडी स्वच्छ धुवावी. नंतर आले लसूण पेस्ट, मीठ आणि दही लावून अर्धा तास तरी ठेवावे.
सुके खोबरे भाजून घेऊन गरम मसाला घालून बारीक वाटावे. हे वाटण कोंबडीच्या आतल्या भागाला लावावे.
पातेल्यात तूप / तेल गरम करून त्यात ओले खोबरे, खसखस + तीळ पूड, बारीक चिरलेला कांदा, लिंबूरस, काजू, मिरची, आले, लसूण, कोथिंबीर, बेदाणे, हळद, मीठ घालून चांगले परतावे. हा मसाला थंड झाल्यावर कोंबडीत भरावा. मसाला बाहेर पडू नये म्हणून दोरा बांधावा.
शेवटी तूप / तेल गरम करून बाहेरच्या बाजूने कोंबडीला लावावे. ओव्हन मधे ठेवून ४०० डिग्री वर ४५ मिनिटे ते १ तास बेक करावी. जाड बुडाच्या पातेल्यात गॅस वर सुद्धा भाजता येईल.
वाढताना सुरीने चकत्या करून कांदा, टोमॅटो चकत्या आणि लिंबाच्या फोडी बरोबर द्यावी.
वाढणी/प्रमाण: 
एक मध्यम कोंबडी चार लोकांना पुरेल.

अधिक टिपा: 
जेवायच्या २ तास आधी oven मधे ठेवली तर वेळेवर व्हायला हरकत नाही. फार आधीही ठेवू नये नाहीतर थंड होते.
या पदार्थाबरोबर पांढरा रस्सा(मटण किंवा चिकन) आणि जीरा पुलाव हा मेनू लोकांना आवडतो.

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
मसाला:
१. १/२ कप कापलेला कांदा ( shallots/ लाल कांदा)
२. १/४ कप लसणाचे तुकडे
३. २ चमचे थाई अद्रक (galangal) / नसेल तर आपले नेहमीचे अद्रक चालेल
४. कोथींबीरीच्या काड्या बारीक कापुन २ चमचे ( हीरवा रंग चालणार असेल तर पानं घेतलीत तरी चालेल)
५. लाल मीरच्या १० ( गरम पाण्यात १० मिनीट बुडवुन ठेवलेल्या), चवीप्रमाने कमी जास्त. पण थाई करी तिखट च असते.
Buy me a coffeeBuy me a coffee ६. लेमन ग्रास (गवती चहाची पाने) बारीक कापुन २ चमचे
७. ३/४ हिरव्या लिंबाची पाने. पाने नसतील तर पीलर ने हिरव्या लिंबाचे वर चे साल घ्यावेत. पांढरा भाग शक्यतो टाळा.
८. मीठ चवीपुरते
९. हळद
करी साठी
९. चिकनचे तुकडे (नॉन वेज साठी)
१०. भाज्या मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्याव्यात - बटाटा, लाल/हीरवी शिमला मिर्ची, गाजर, फ्लावर, मशरुम ईत्यादी (वेज आणि नॉन वेज साठी)
११. कांद्याची पात बारीक कापुन
१२. बेसील (एका पानचे २/३ तुकडे होतील अशी) कापुन.
११. नारळाच दुध २ ते ३ कप
१२. फोडणीसाठी तेल
क्रमवार पाककृती: 
१. मसाल्याचे जिन्नस सगळे मिक्सर मधे बारीक वाटुन घ्या
२. पॅन मधे २/३ चमचे तेल घेउन त्यात वरील मसाला चांगला परतवुन घ्या
३. ह्यात नारळाचे दुध टाकुन चांगले घोटुन एक उकाळी येउ द्या.
४. मीठ आणि हळद टाका
५. नॉन वेज करणार असाल तर आधी चिकन अर्धवट शिजवुन त्यात भाज्या (कांद्याची पात आणि बेसील पण) टाकुन शिजवुन घ्या. वेज साठी भाज्या लगेच टाकुन शिजवुन घ्याव्यात.
वाढणी/प्रमाण: 
४/५ जणांसाठी
अधिक टिपा: 
१. ही करी थाई जास्मीन राईस बरोबर छान लागते
२. वाढतांना वरुन बेसील चे पानं टाकुन वाढा.
३. भाज्या शक्यतो ओवर कुक करु नयेत. चालत असतील तर अर्धकच्च्या चांगल्या लागतात.

साहित्य-
६-७ अंडी
एक जूडी पालक
दोन छोटे किंवा एक मोठा कांदा चिरून
१ चमचा आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
अर्धा चमचा हळद
१ चमचा मसाला
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा गरम मसाला
चवी नुसार मिठ
अर्धा किंवा पाव लिंबू
फोडणी पुरते तेल.
कृती-
 प्रथम अंडी उकडून, साले काढून त्याला सुरीने हलक्या हाताने वरून चिरा द्या.
२) पालक गरम पाण्यात थोडा वाफवून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करुन घ्या.


३) भांड्यामध्ये तेल गरम करून त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत शिजवा.

४) शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला घालून जरा परतवा.


५) आता वरील मिश्रणावर पालक घालून थोड ढवळा व त्यात गरजे नुसार मिठ, लिंबू रस व गरम मसाला घालून ढवळा.



६) ह्या मिश्रणाला थोडी उकळी आली की त्यात उकडलेली अंडी सोडून हलक्या हाताने ढवळा व झाकण देऊन थोडी वाफ येऊ द्या.

तयार आहे अंडी पालक.

साहित्य :

१/२ kg .  रोहू फिश
१/४ टीस्पून ओवा
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
२ टेबलस्पून लिंबूरस
३ टेबलस्पून तांदळाचं पीठ
१ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
मीठ चवीप्रमाणे
४ टेबलस्पून तेल (शालो फ्राय करण्यासाठी)
कृती :
१. पुर्ण माशाचे पोट साफ करून घ्या व त्याला चिरे पाडा.
२. माशाला आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट,  हळद, लिंबूरस, ओवा, मीठ लावून १ तास मॅरीनेट करून ठेवा.
३. मॅरीनेट केलेल्या माशाला  तांदळाच्या पिठात घोळवा.  एका तव्यावर तेल गरम करा आणि तुकडे शालो फ्राय करून घ्या.लिंबू आणि मिठामुळे तुकड्यांना पाणी सुटेल त्यामुळे तांदळाचे पीठ चिकटून राहील आणि तुकडे चांगल्या प्रकारे फ्राय  करता येतील.
४. तुकडे ५ मिनिटा नंतर उलटे करा आणि दुसरी बाजू सुद्धा फ्राय करून घ्या.  गरज वाटल्यास थोडे तेल घाला. दोनही बाजू खरपूस भाजल्यावर जास्तीचे तेल टिशू  पेपरनी  टिपून घ्या आणि ग्रीन मिंट चटणी बरोबर सर्व्ह करा.

साहित्य :
 1 किलो देशी चिकन, 1/2 किलो कांदे चिरलेले, 2-3 लसूण पाकळ्या, 1 कप टोमॅटो बारीक चिरलेले, 1 चमचा जिरं, 1 चमचा तिखट, 2 बटाटे कापलेले, 1 लहान तुकडा दालचिनी, 3-4 वेलची, 3-4 लवंगा, 2 तेजपान, 3 मोठो चमचे तेल.
कृती :
 सर्वप्रथम वेलची, लवंगा आणि दालचिनी यांचे पेस्ट तयार करावे. चिकनमध्ये चिरलेल्या कांद्यापैकी अर्धे मिक्स करावे. लसणाच्या पाकळ्यासुद्धा अर्ध्या मिसळाव्या. टोमॅटो घालावे, 1/2 चमचा तिखट, जिरं आणि हळद घालावे. मीठ आणि 1 चमचा तेल लावून 2 तासासाठी मेरीनेट करावे. कढईत तेल गरम करत ठेवावे. उरलेलं जिरं घालून कांदा व लसुण परतून घ्यावे. तिखट घालून 1 मिनिट परतावे. मेरीनेट चिकन आणि बटाटे टाकावे. 5 मिनिट शिजल्यावर 1/2 वाटी पाणी घालून कमी आचेवर शिजू द्या. सर्व्ह करताना गरम मसाला वरून घालावे.

साहित्यः
मोठी कोलंबी : ५०० ग्रॅम्स.
आलं : १ इंचं.
लसूण : ८ पाकळ्या.
ह्ळद : १/२ लहान चमचा (टि स्पून).
तिखट : १ लहान चमचा (किंवा आवडीनुसार जास्त).
हिरव्या मिरच्या : ३ नग. आख्या, उभी चीर देऊन.
कांदा : १ मध्यम.
टोमॅटो : १ मध्यम.
कढीलिंब : १७ ते १८ पानं.
नारळाचे तेल : अर्धी वाटी.(नारळाचे तेल आवडत नसल्यास कुठलेही आवडीचे खाद्यतेल घ्यावे).
जीरं : १ मोठा चमचा (टेबल स्पून)
नारळ : १ नग
मीठ : चवीनुसार.
तयारी:
कोलंबी स्वच्छ करून त्यातील काळा धागा काढून टाका. कोलंबीला हळद-मीठ लावून ठेवा.
आलं+लसूण वाटून घ्या.
कांदा टोमॅटो वेगवेगळे बारीक चिरून घ्या.
कढीलिंब धुवून घ्या.
नारळ खवून त्याचे जाड आणि पातळ दूध काढा. (नारळ आणि दिड ग्लास कोमट पाणी घालून मिक्सर मध्ये भरपूर वाटून, हे मिश्रण पातळ कपड्याने गाळून घ्या. हे झाले जाड दूध . आता तोच नारळाचा चोथा मिक्सरमध्ये घालून अर्धा ग्लास कोमट पाणी घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून हे मिश्रण पातळ कपड्याने गाळून घ्या हे झाले पातळ दूध. जाड आणि पातळ दूध वेगवेगळे ठेवा.)
कृती:
कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवा.
तेल तापले की त्यात जीरे घाला. जीरे तडतडले की कढीलिंब आणि हिरव्या मिरच्या घाला.
कढीलिंबाचा वास आणि मिरच्यांचा तिखटपणा तेलात उतरला की बारीक चिरलेला कांदा टाकून परता.
कांदा गुलाबी रंगावर परतून झाला की टोमॅटो घालून परता.
टोमॅटो शिजून कांद्याशी एकजीव झाला की कोलंबी आणि आलं-लसूण पेस्ट घालून परता.
आंच मंद करून, कोलंबी बुडतील इतके (जरा कमीच) नारळाचे पातळ दूध घाला. सर्व मिसळून घ्या.
कोलंबी लवकर शिजते. ती शिजली की नारळाचे जाड दूध घाला.
जाड दूध घातल्यावर उकळू नका. रस्सा साधारण चांगला गरम झाला की गॅस बंद करा.
हे कालवण गरम भात किंवा अप्पम बरोबर, केल्यादिवशी, चांगले लागतेच पण दूसर्‍या दिवशी अधिक मुरते. फक्त दूसर्‍या दिवशी फ्रिझ मधून काढल्यावर गॅसवर किंवा मायक्रेवेव्ह मध्ये हलके गरम करावे. उकळू नये नाहीतर नारळाचे दूध फाटते.
/>