साहित्य:-
2 सफरचंद (हिरवी किंवा लाललिंबु पाणी (सफरचंद तपकिरी न होण्यासाठी)
2 चमचे साखर
1/4 चमचा दालचीनी पावडर
1/4 कप (55 ग्रॅम) लोणी
2 चमचे ब्राऊन शुगर
1/2 चमचा मीठ
1 कप (240 मिली) पाणी
1 कप (125 ग्रॅम) मैदा
4 अंडे
तेल तळण्यासाठी
कोटींग साठी:
1/4 कप (50 ग्रॅम) बारीक साखर1 चमचा दालचीनी पाउडर
Buy me a coffee
साधन:
1 पाइपिंग बॅग किंवा आपला चकल्याचा झारा चालेलकृती:
- सफरचंदाची साल पीलर ने काढून ती लिंबाच्या पाण्यात बुडवून ठेवा (तपकिरी होणार नाहीत)
- नंतर सफरचंद काढून किसनीने त्याचा कीस काढून घ्या
- एका भांड्यात किसलेले सफरचंद साखर आणि दालचीनी शिंपडून बाजुला ठेवा
- high गॅस वर सॉस पॅन घेवुन त्यात लोणी,ब्राऊन शुगर,मीठ आणि पाणी एकत्र मिक्स करुन एक उकळी येवू द्या
- गॅसला मंद आचेवर करुन त्यात मैदा टाका.... लाकडी चमचा वापरुन सारखे हलवत रहा , जोपर्यंत पिठाचा बॉल होत नाही तोपर्यंत (1 मिनिट पर्यंत)
- ह्या मिश्रणाला गॅस वरुण काढून 5 मिनिटं थंड होण्यासाठी बाजुला ठेवा ( पूर्ण थंड होऊ द्या कारण नंतर अंडी हयामधे टाकायचीत)
- एकावेळी एक अंडे ह्या मिश्रणात टाकावे व चांगले हलवून एकजीव केल्यानंतरच दुसरे अंडे टाकावे, हेच बाकी दोन अंड्यासाठी करावे.
- एका साफ कपड्यावर आधी बनवलेला सफरचंद कीस घेवुन तो पिळून काढावा..त्यातील पूर्ण पाणी काढावे
- मग हा कीस आपण नंतर बनवलेल्या कणीकच्या मिश्रणात टाकुन लाकडी चमचाने हलवून सगळे एकजीव करावे
- नंतर हे मिश्रण पाइपिंग बॅग मधे किंवा चकलीच्या झार्यात टाकावे
- एका कढईत तेल घेवुन ते 180 डिग्री सेल्सियस पर्यंत उकळवा
- मग त्यात मिश्रण पाइपिंग बॅग किंवा झर्याने 3 किंवा 4 इंचाच्या तुकड्यात टाकावे व सोनेरी कलर येईपर्यंत तळावे
- तळलेल्या नगेट्स ना नंतर बारीक साखर आणि दालचीनीच्या मिश्रणाने कोट करावे....
- झाले तुमचे स्वादिष्ट सफरचंद नगेट्स तयार.... रेसिपी आवडली तर खाली जरुर प्रतिक्रिया द्या
0 comments:
Post a Comment