AURANGABAD FOODIE

खाओ सोय-थाई सूप

0

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
नॉर्दनमोस्ट थायलँड ची खासियत असलेले हे सूप, अगदी बँकॉक मधे ही शोधून सापडणार नाही. पोट भरण्यासाठी,बस्,एक बोल ही काफी है!! Happy
अतिशय चविष्ट आणी पौष्टिक असं हे सूप करायलाही सोपं आहे.
तर पेश आहे ,'ऑथेंटिक खाओ सोय'
लागणार्‍या जिन्नसांची यादी लंबी चौडी दिसत असली तरी तुमच्या किचन मधे यापैकी ९५% जिन्नस सापडतील..
मसाला पेस्ट करता-
१) १/२ टेबल स्पून हळद
२) ३ तेजपाने (बे लीफ)
३) १ १/२ टेबलस्पून धन्याची पूड
४) १ टेबल स्पून जिरपूड
५) २ टी स्पून आल्या ची पेस्ट किंवा इंचभर लांबी चे आले,चकत्या करून
६) १ टी स्पून पांढर्‍या किंवा काळ्या मिर्‍याची पूड
७) ३ टी स्पून किंवा आवडीनुसार तिखट चिली फ्लेक्स
८) १ लवंग
९) लसणाच्या ८,९ सोललेल्या पाकळ्या ,चकत्या करून
१०) २ मध्यम आकाराचे कांदे- उभे पातळ चिरून
११) १/४ कप कोथिंबीर मुळांसकट चिरलेली
१२) ५,६ वाळक्या लाल मिरच्या ( तिखट वर्जन)
१३) तीनेक इंच लांबी चे गालांगल
१४) काफिर लाईम ची मूठभर पाने
१५) १ टी स्पून काफिर लाईम पावडर
सूप करता
१) १ टेबलस्पून तेल
२) १ किलो चिकन ब्रेस्ट आणी लेग्स ( मोठेसेच तुकडे घ्यायचेत)
३) ३ कप होम मेड चिकन स्टॉक
(थोडे चिकन पीसेस( वेगळे घ्यायचेत- वर लिहिल्यापैकी नाही ) , बोन्स सकट भरपूर पाण्यात उकळत ठेवावे. यात सेलेरी ची पाने, एक मोठा कांदा चिरलेला, दोन लहान कॅप्सीकम चिरलेले, ४,५ लसणाच्या कळ्या ठेचून घेतलेल्या, ( पांडान लीव्ज- ऑप्शनल) आणी मीठ
घाला. खूप उकळल्यावर स्टॉक गाळून काचेच्या बरणीत स्टोअर करून फ्रीज मधे ठेवावा. आमच्याकडे हा स्टॉक , स्टॉक मधे करून ठेवलेला असतो. यातील चिकन, श्रेड करून फ्राईड राईस मधे वापरता येते.)
४) १ कॅन नॉन स्वीटंड कोकोनट मिल्क-ऑनलाईन भेटेल -https://amzn.to/2uSbGKM
५) २ पॅकेट्स एग नूडल्स - ऑनलाईन भेटेल- https://amzn.to/2uQaJTa
सजवण्याकरता
१) दोन लहान कांदे - पातळ काप करून
२) विनीगर मधील हिरव्या मिर्च्या ( रेडीमेड)
३) कांद्याच्या पाती बारीक चिरून घेतलेल्या
४) २,३ लिंबांच्या फोडी
क्रमवार पाककृती: 
१)मसाला बनवण्याकरता दिलेले जिन्नस , एकेक करून सर्व कोरडे भाजून घ्या.
(काफिर लाईम ची पाने आणी वाळक्या मिरच्या वगळून)
२) तोपर्यन्त वाळलेल्या मिरच्या, थोड्या गरम पाण्यात भिजवून ठेवा.
३) सर्व जिन्नस भाजून घेतल्यावर मिक्सरवर अगदी बारीक वाटून घ्या.
४) मोठ्या भांड्यात तेल गरम करायला ठेवा. यात मसाला पेस्ट टाकून, तेल वर येईस्तो परता.
५) ही सर्व तयारी होत असता दुसर्‍या गॅस वर कढईत चिकन चे तुकडे परतायला ठेवा. चिकन चा रंग चारी बाजूने पिवळसर झाला की गॅस बंद करा. अ‍ॅक्चुली थाय लोकं कच्चेच चिकन चे तुकडे टाकतात पण आपल्याला परतल्याशिवाय चैन नाही नं पडत.. म्हणून!!!
६) मसाला नीट फ्राय झाला कि त्यात पाणी, चिकन स्टॉक घाला. उकळी फुटल्यावर काफिर लाईम ची पाने, कोकोनट मिल्क अ‍ॅड करा.
खूप थिक नको सूप. जरूरी नुसार पाणी किंवा चिकन स्टॉक अ‍ॅड करा. आता चिकन पीसेस घालून नीट मिक्स करा.
झाकण ठेवून चिकन , मऊ शिजेपर्यन्त मंद गॅस वर ठेवून द्या.
७) तोपर्यन्त पाकिटावर लिहिलेल्या सूचनांनुसार एग नूडल्स शिजवून ठेवा.
८) खायला घेताना बोल मधे एग नूडल्स घ्या. वरून गरमागरम सूप, नूडल्स बुडतील इतके घ्या. लिंबु पिळणे मस्ट आहे. आवडीनुसार आंबटपणा कमी आधिक ,अ‍ॅडजस्ट करता येईल.

0 comments:

Post a Comment

/>