AURANGABAD FOODIE

पोहा चिकन भुजिंग

0

साहित्य – ३०० ग्रॅम चिकन, धणे जिरे कूट, २ बटाटी, २०० ग्रॅम पोहे, ओरिजनल घरगुती  मसाला, हळद, लिंबाचा रस, १५ लसूण पाकळ्या, दीड इंच आले, अर्धी वाटी भाजलेले सुखे खोबरे, ३ हिरव्या मिरच्या, २ माध्यम कोळशे, तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती – प्रथम एका भांड्यात बटाटी आणि चिकन घ्यावे. त्यावर आता एक मोठा चमचा हळद (या रेसिपी मध्ये हळदीचे प्रमाण थोडे जास्तच असते), दीड चमचे धना-जिरा कूट, अर्धा चमचा मीठ ( आपण नंतर देखील यात मिठाचा वापर करणार आहोत म्हणून सुरुवातीला चिकनला मुरेल इतकंच मीठ वापरावे). सर्व मिश्रण आता एकजीव करून घ्यावे. चिकन आणि बटाटयाच्या मिश्रणाला ३० मिनिटे मॅरिनेशनसाठी ठेवावं. मॅरिनेशन झाल्यावर एक प्यान मध्ये ३ चमचे तेल घेऊन त्यात चिकन आणि बटाट्याचे मिश्रण तळण्याकरिता सोडावे घ्यावे. चिकन आणि बटाट्यांना व्यवस्थित तेल लागेल असे मिक्स करून घ्यावे, थोड्या वेळाकरिता चिकनला वर झाकण ठेवून वाफ काढावी. थोड्या मोठ्या आचेवर चिकन मस्त तांबूस सोनेरी रंगापर्यंत ८०% शिजवून घ्यावे. आता आपण भुजिंगची प्रक्रिया सुरू करूया. गॅसवर २ मोठे कोळशाचे तुकडे घेऊन चांगले जळवून घ्यावेत. कोळशे चांगले जळवून झाल्यावर प्यानमध्ये एक छोटी खोलगट वाटी घेऊन त्यात हे कोळशे टाकावे आणि कोळशावर थोडे तेल किंव्हा तूप टाकून छान स्मोक काढावा. ( टीप – आपल्याजवळ जर बार्बीक्यू किंव्हा ओव्हन असेल तर आपण चिकन त्यातही शिजवू शकता. बार्बीक्यू किंव्हा ओव्हन नसल्यास हा एक उत्तम मार्ग आहे, कारण आपल्याला फक्त या रेसिपीसाठी चिकनला एक छान स्मोकी फ्लेव्हर पाहिजे. ) स्मोक ( धूर ) निघाल्यावर लगेच त्यावर १५ मिनिटे झाकण बंद करून ठेवावे. आता या रेसिपीच्या दुसऱ्या पायरीची तयारी करूया. आपल्याला येथे एक चटणी तयार करायची आहे त्यासाठी सर्वप्रथम अर्धी वाटी भाजलेलं सुखं खोबरं, १० ते १२ लसूण पाकळ्या, दीड इंच आले, ३ हिरव्या मिरच्या, एक चमचा घरगुती मसाला आणि एक मोठा चमचा धनाजिऱ्याचे कूट टाकून जाडसर चटणी तयार करायची. एका कढईमध्ये ३ मोठे चमचे तेल गरम करून त्यात पात्तळ चिरलेला कांदा टाकावा. कांदा सोनेरी रंगापर्यंत तांबूस करून घ्यावा. कांदा सोनेरी रंगासारखा झाल्यावर त्यात आपण तयार केलेली चटणी टाकावी. चटणी आणि कांदा चांगला परतून घ्यावा. चटणी आणि कांदा परतून झाल्यावर त्यात स्मोक केलेली चिकन आणि बटाटी टाकावीत. चिकन आणि बटाटी या मिश्रणात चांगली एकजीव करावीत. मिश्रण एकजीव करून झाल्यावर त्यात २ चमचे लिंबाचा रस टाकावा. चवीनुसार मीठ टाकावे. ( लक्षात ठेवा की आपण सुरुवातीला थोडे चिकनला मीठ लावले होते त्यानुसार मिठाचा वापर करावा.) मीठ टाकून झाल्यावर सर्व जिन्नस एकत्रित परतून घ्यावे. आता आपण येथे पोहे भिजवून घेणार आहोत. ( आपण जसे कांदा पोह्याला भिजवून घेतो तसेच. ) भिजवलेले पोहे या चिकनच्या मिश्रणामध्ये टाकावे. चिकनचे मिश्रण पोह्यांना चांगले लागेल असे मिक्स करून घ्यावे. मिक्स करून झाल्यावर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी आणि पुन्हा चांगले एकजीव करून घ्यावे. आता हे पोहा चिकन भुजिंग आपण छान प्लेट मध्ये काढून घेऊयात. तयार आहे सूंदर आणि पारंपरिक अशी ‘ पोहा चिकन भुजिंगची’ अप्रतिम डिश खास तुमच्यासाठी.


0 comments:

Post a Comment

/>